नाना पटोलेंनी आधी आदर्श नागरीक बनावं; मुनगंटीवारांचा सणसणीत टोला

नाना पटोलेंनी आधी आदर्श नागरीक बनावं; मुनगंटीवारांचा सणसणीत टोला

नाना पटोले यांच्या टीकेचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी समाचार घेतला आहे.
Published on

भंडारा : राज्यात दंगलीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपकडून जातीय तेढ निर्माण केले जात असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. या टीकेचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी समाचार घेतला आहे. नाना पटोलेंनी आधी आदर्श नागरीक बनावं. त्यानंतर दुसऱ्यावर आरोप करावा, असा सणसणीत टोला मुनगंटीवारांनी पटोलेंना लगावला आहे.

नाना पटोलेंनी आधी आदर्श नागरीक बनावं; मुनगंटीवारांचा सणसणीत टोला
विरोधकांकडे नोटा जास्त असतील म्हणून...; 2 हजारांच्या नोटा रद्दनंतर एकनाथ शिंदेंची टोलेबाजी

नाना पटोले भाजपाचे चांगले काम आहे असे म्हणतील का? त्यांचे कामच आहे. कधी म्हणतात आरडीएक्स घेवून गेले. मात्र कधी आदर्श नागरीक बनण्याचा प्रयत्न करीत नाही. तुमच्याकडे पुरावे आहेत तर पोलिसांना द्यायचं हे काम नाही काय त्यांचे?

तुम्ही नागरीकशास्त्र शिकले नाही का? सातशे गुणांपैकी 25 गुणही शिकले नाही? तुम्ही जर भारतीय आहात तर पोलिसांना माहिती दिली का? असा खडा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोले यांना विचारला आहे.

दरम्यान, दोन हजार नोटा चलनातून बंद झाल्यामुळे सामान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. काँग्रेसकडे असलेला काळा पैसा आता थंडीच्या दिवसात शेकोटी पेटविण्याच्या कामात येईल, असा निशाणाही सुधीर मुनगंटीवारानी काँग्रेसवर साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com