Sudhir Mungantiwar : ...तर भुजबळ-राऊत-राज ठाकरे-अनिल परब हे भाजपमध्ये दिसले असते

Sudhir Mungantiwar : ...तर भुजबळ-राऊत-राज ठाकरे-अनिल परब हे भाजपमध्ये दिसले असते

सुधीर मुनगंटीवार यांनी उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा
Published on

अनिल ठाकरे | मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुलाखत दिली आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी टीका केली आहे. ज्यांनी राणे-कंगना-नवनीत राणा यांच्यावर सूड उगवला ते आता सूडाची भाषा करत आहेत. आज खंजीर खुपसला अशी भाषा करणाऱ्यांना भविष्यात तेच बोधचिन्ह मिळो, अशी खोचक टीकाही मुनगंटीवार यांनी केली.

Sudhir Mungantiwar : ...तर भुजबळ-राऊत-राज ठाकरे-अनिल परब हे भाजपमध्ये दिसले असते
Uddhav Thackeray Interview : महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग चुकला, उध्दव ठाकरेंनी सांगितले...

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची मुलाखत कौटुंबिक मुलाखत असून त्यांनी मुलाखतीत वापरलेले शब्द राज्याच्या संस्कृतीला न मानवणारे आहेत. शिवसेना आमदारांनी व्यक्त केलेला बाळासाहेब ठाकरे यांचा विचार उद्धव ठाकरे यांनी तुडविल्याची टीका त्यांनी केली आहे. ज्यांनी राणे- कंगना- नवनीत राणा यांच्यावर सूड उगवला ते आता सूडाची भाषा करत आहेत. आज खंजीर खुपसला अशी भाषा करणाऱ्यांना भविष्यात तेच बोधचिन्ह मिळो, असा निशाणाही मुनगंटीवार यांनी उध्दव ठाकरेंवर साधला.

बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो विचार म्हणून लावला जातो. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो खाजगी मालमत्ता नाही. जर असेच असेल तर बाळासाहेब सामान्य शिवसैनिक यांचे पिता नव्हे त्यांनी तरी बाळासाहेबांचा फोटो का लावावा? छत्रपती शिवरायांचा फोटो केवळ उदयनराजे यांनी तर शाहू महाराजांचा फोटो त्यांच्या वंशजांनी लावावा का, असेही प्रश्नही मुनगंटीवारांनी उपस्थित केला आहे.

Sudhir Mungantiwar : ...तर भुजबळ-राऊत-राज ठाकरे-अनिल परब हे भाजपमध्ये दिसले असते
Ashish Shelar : मुलाखतीपेक्षा टीजर चांगला होता

जर ईडीच्या दबावामुळे नेत्यांचा भाजप प्रवेश होत असेल तर भुजबळ-राऊत-राज ठाकरे-अनिल परब हे देखील भाजपमध्ये दिसले असते. स्वतःला पराक्रमी समजत अन्य सर्वांना सामान्य बनवण्याचे चित्र रंगविले जात असल्याचे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांच्या सहकाऱ्याने कधीकाळी शरद पवारांना पितामह भीष्म संबोधले होते. आता कौरवांची बाजू सोडून अर्जुन खोतकर शिंदे गटात येत असेल तर पांडवांकडे येत आहेत, असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत.

आपल्या शस्त्रक्रियेच्या काळात सरकार पाडण्याचा डाव आखला गेला, असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे म्हणजे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांची ही जुनी रेकॉर्डींग असून ती अजूनही अडकलेलीच आहे, असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्या समजूतदार मुलाखती अनुभवायच्या असतील तर मुंबईत त्यांचा एकदा पराभव करा तरच ही शब्दरचना बदलेल, असेही मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com