कोणाच्या ट्विटला उत्तर देण्यासाठी बांधील नाही, हे केवळ प्रसिद्धीसाठी; रोहित पवारांचे जोरदार प्रतिउत्तर
Rohit Pawar on mohit kamboj : मागील काही दिवसात राज्यात राजकीय घडामोडींना उफाळी फुटत आहे. त्यातच भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटने राजकारणात एकच गोंधळ घातला आहे. येत्या काही दिवसात त्यांनी स्फोटक आणि वादग्रस्त ट्वीट केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मोहित कंबोज यांनी ट्विटरवरुन आमदार रोहित पवार यांच्यावर लक्ष केले आहे. यालाच प्रतिउत्तर आता रोहित पवारने दिले आहे. सर्व आरोप त्यांनी फेटाळून त्यांनी मोहित कंबोज यांच्यावर विखारी टीका केली आहे.(Strong reply from Rohit Pawar to mohit kamboj tweet)
उत्तर देण्यासाठी बांधील नाही
रोहित पवार घडामोडींवर बोलताना म्हणाले की, ईडीकडून अद्यापर्यंत काहीही विचारले गेलेले नाही. याबाबत कोणती चौकशीही झालेली नाही. केवळ प्रसिद्धीसाठी हे ट्विट केले जात आहे. शिवाय कुणाच्या ट्विटला आणि मिडियाला उत्तर देण्यास आपण बांधिल नाही. आणि कंपनीची चौकशी हे काय नवीन नाही. गेल्या 7 वर्षात वेगवेगळ्या संस्थाकडून कंपनीची चौकशी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून विचारणा झाली तर आपले सहकार्यच राहणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे.
काहींना प्रसिद्धीचे व्यसन
सोशल मिडीयाचा वापर हा प्रसिद्धीसाठी केला जात आहे. काहींना तर याचे व्यसनच जडले आहे. मला उद्देशून जे काही ट्विट झाले ते केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. तर आपल्याला कोणत्याही संस्थेची नोटीस आलेली नाही. प्रसिद्धीसाठी असले फंडे वापरले जात आहेत. अशी नाव न घेता त्यांनी कंबोज यांच्यावर टीका केली आहे. संस्थाकडून होणारी चौकशी ही काही नवीन नाही तो एक प्रक्रियेचा भाग आहे.अनेक वेळा चौकशी झाली आहे.भविष्यात विचारणा झाली तर सहकार्य राहणारच असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.