Gajanan Kirtikar, Rohit Pawar
Gajanan Kirtikar, Rohit PawarTeam Lokshahi

''तुमचे हे धंदे बंद करा'' शिवसेना खासदाराचं भर कार्यक्रमात आमदार रोहित पवारांना इशारा

शिवसेनेच्या खासदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर निशाणा साधला आहे
Published by :
shweta walge
Published on

शिवसेनेच्या खासदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कुरबुरी नेहमीच सुरु असते. अशातच शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर निशाणा साधत इशारा दिला आहे.

शिवसेना (ShivSena) खासदार गजानन कीर्तीकर सध्या शिवसंपर्क अभिनयासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान कर्जत (Karjat) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी वक्तव्य केले आहे की, राज्यात महाविकास आघाडी करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार (Sharad Pawar) यांचे मोलाचे योगदान आहे. त्याची जान राजकारण करताना ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आमदार रोहित पवार यांनी दबाव टाकण्याचे धंदे बंद करावेत.

पुढे कीर्तिकर यांनी म्हटलं की, आमदार रोहित पवार यांनी आघाडीचा धर्म पाळत मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांना आणि पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शिवसेनेला वाटा देण्यात यावा. त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये होणार्‍या विकास कामांमध्ये शिवसैनिकांना सहभागी करून घ्यावे.

Gajanan Kirtikar, Rohit Pawar
Sanjay Raut |'भाजपने संभाजीराजेंचा गैरवापर केला'

शिवसेना पदाधिकार्‍यांनी ज्या तक्रारी केल्यात, यावरून या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिक ही बांधिल राहणार नाहीत असा इशाराच शिवसेनेचे खासदार गजानन किर्तिकर यांनी दिला आहे.

रोहित पवार यांनी कर्जतमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे. कीर्तिकर यांच्या आरोपांवर रोहित पवार नेमकं काय उत्तर देतात याकडे लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com