Pravin Togadia
Pravin TogadiaTeam Lokshahi

पाकिस्तानचे नदीचे पाणी थांबवा अन्यथा क्षेपणास्त्र हल्ला करा : प्रवीण तोगडिया

यवतमाळमध्ये प्रवीण तोगडिया यांची मोदी सरकारकडे मागणी
Published on

संजय राठोड | यवतमाळ : हिंदूंवरील अत्याचार कमी झाले नाहीत तर पाकिस्तानचे नदीचे पाणी थांबवा अन्यथा पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला करा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मोदी सरकारकडे केली आहे. यवतमाळमध्ये ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

Pravin Togadia
बाळासाहेब थोरात करणार भाजप प्रवेश? बावनकुळे म्हणाले...

पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली यांच्यात एक करार झाला होता. या करारानुसार पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतील तर भारत पाकिस्तानमधील हिंदूंच्या पाठीशी उभा राहील, असे या करारात नमूद करण्यात आले होते. पाकिस्तानने ऐकले नाही तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी भारतातून पाकिस्तानकडे वाहणाऱ्या नदीचे पाणी बंद करावे, अशी मागणी तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. नाही ऐकलं तर पाकिस्तानवर क्षेपणास्त्र चाचणी करा.

राम मंदिराचे बांधकाम थांबवून रामभक्तांवर गोळीबार करणाऱ्या मुलायम सिंह यांना केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. मात्र पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, कोठारी बंधू आदी रामभक्तांचा आदर करावा आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणीही प्रवीण तोगडिया यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com