Sonia Gandhi Ed Enquiry : आंदोलनकर्त्यांसह राहुल गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Sonia Gandhi Ed Enquiry : आंदोलनकर्त्यांसह राहुल गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

राहुल गांधींसह काँग्रेसचे बडे नेतेही पोलिसांच्या ताब्यात
Published on

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना आज पुन्हा एकदा ईडीने (ED) चौकशीसाठी बोलावलं आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या समर्थनात आज काँग्रेस (Congress) पक्षाकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं येत आहे. या सत्याग्रह आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला आहे. यावेळी पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतले आहे.

ईडीसह केंद्रीय एजन्सींचा गैरवापर, किंमतीत वाढ ते जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारच्या विरोधात निदर्शने राहुल गांधींसह देशभरात कॉंग्रेस नेते आंदोलन करत आहेत. यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांनी घेरले होते. सुमारे 30 मिनिटे चाललेल्या गोंधळानंतर राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आले असून बसमध्ये ठेवण्यात आले आहे. राहुल गांधींसह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, राहुल गांधी म्हणाले की, भारतात पोलिस राजवट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजा आहेत, अशी टीका त्यांनी केले आहे.

तर, कॉंग्रेसच्या ट्विटवर राहुल गांधींचा फोटो ट्विट करत केंद्रसरकारवर टीका केली आहे. हुकूमशाही पहा, शांततापूर्ण निदर्शने करू शकत नाही, महागाई आणि बेरोजगारीवर चर्चा करू शकत नाही. पोलिस आणि एजन्सीचा गैरवापर करून, आम्हाला अटक करूनही तुम्ही आम्हाला शांत करू शकणार नाही. 'सत्य'च या हुकूमशाहीचा अंत करेल, असे कॉंग्रेसने म्हंटले आहे.

दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून मंगळवारी सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा चौकशी करण्यात येणार आहे. याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचे देशभरात आंदोलन सुरु असून पक्षाचे वरिष्ठ नेते राजघाटावर जाऊन मूक आंदोलन करत आहेत. यावेळी पोलिसांनी अनेक ठिकाणी कॉग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com