कुणीतरी बॅक सीटवरून ड्राइव्हिंग करतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मागील काही दिवसात राज्यात प्रचंड राजकीय खळबळ उडाली होती. या गोंधळा दरम्यान शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरीकरत राज्यात भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन केली. राज्याचे मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले. राजकीय लोकांसाठी हा एक आश्चर्याचा धक्का होता. यामुळे राज्यात चर्चांनां उधान आले. मात्र विरोधकांनी ही संधी साधत यावर जोरदार टीका टिप्पणी करण्यास सुरवात केली. हे सर्व आरोप होत असताना राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. सध्या विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनात कॉंग्रेस नेते पुथ्वीराज चव्हाण बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कुणाचा तरी दबाव, कुणीतरी बॅक सीटवरून ड्राइव्हिंग करतंय, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण ?
आज विधानसभेत पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस चालू असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बोलण्यासाठी उठले यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर कुणाचा तरी दबाव आहे, कुणीतरी बॅक सीटवरून ड्राइव्हिंग करतंय, असंही ते म्हणाले. “एकनाथ शिंदे यांच्याकडे आधी नगरविकास खातं होतं आणि आता सत्ताबदल झाल्यानंतरही त्यांच्याकडे तेच खातं आहे. त्यांच्या सद्विवेक बुद्धिला आपण विचारलं तर सुरुवातीला त्यांनी अप्रत्यक्ष निवडणुकीचा निर्णय घेतला. आता पुन्हा हा निर्णय थेट निवडणुकीचा होतोया. यातून एक संदेश जातोय की मुख्यमंत्र्यांवर कुणाचा तरी दबाव आहे. मंत्रिमंडळात कुणीतरी बॅक सीटवरून ड्रायव्हिंग करतंय”, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
वारंवार विरोधकांची मुख्यमंत्र्यांवर टीका
राज्यात शिवसेनेत बंडखोरी करत राज्यात शिंदे भाजप सरकार अस्थित्वात आले. दरम्यान, सर्वाना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असताना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्यामुळे सर्वांना आश्चर्यच वाटले. मात्र, मुख्यमंत्री जारी एकनाथ शिंदे असले तरी काय काम करायचे? काय नाही ? हे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांगतात. असा गंभीर आरोप विरोधाकांकडून वारंवार करण्यात येतो.