eknath shinde
eknath shindeTeam Lokshahi

ठाकरेंच्या मशालीनंतर आता शिंदेंच्या 'ढाल-तलवार' चिन्हाला शीख समाजाचा विरोध

खालसा पंथाचं धार्मिक प्रतीक आहे, त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगानं द्यायला नको होतं,रणजीत सिंह यांचे मत
Published by :
Sagar Pradhan
Published on

शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर आता निवडणूक आयोगाने आता दोन्ही गटाला नवे चिन्ह दिले आहे. मात्र, एकमेकांवर आरोप होत असताना दोन्ही गटाला आता चिंतेत टाकणारी घटना घडली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाला समता पार्टीने विरोध केल्यानंतर आता शिंदे गटाच्या चिन्हाला नांदेडच्या शीख समाजाने विरोध दर्शवला आहे.

eknath shinde
ठाकरेंची 'मशाल' धोक्यात? आज हायकोर्टात दाखल होणार चिन्हा विरोधी याचिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ढाल-तलवार चिन्हावर नांदेडच्या शीख समाजातर्फे आक्षेप घेण्यात आला आहे सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवलं आहे. त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याकारणानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते नाकारलं याप्रमाणे ढाल-तलवार हेदेखील खालसा पंथाचं धार्मिक प्रतीक आहे, त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगानं द्यायला नको होतं. या संदर्भातील निर्णय नाही झाला तर रणजीत सिंह न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याच्या शकता आहे.

eknath shinde
मी राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो - अमित ठाकरे

खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळतं जुळतं असल्यानं त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी केली आहे. तसं, निवेदनही त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे.

समता पार्टीचा ठाकरेंच्या मशालला विरोध

समता पार्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 'मशाल' चिन्हाला विरोध केला असून आज त्यांच्याकडून दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे.अंधेरी पोटनिवडणुकीत मशाल चिन्ह देऊ नये' समता पक्ष आज दिल्ली हायकोर्टात बाजू मांडणार. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा मशालवर आज सुनावणी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com