निवडणूकीची खुमखुमी असेल तर राजीनामा द्याच आणि...; श्रीकांत शिंदेंचे ठाकरे गटाला आव्हान

निवडणूकीची खुमखुमी असेल तर राजीनामा द्याच आणि...; श्रीकांत शिंदेंचे ठाकरे गटाला आव्हान

शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
Published on

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नैतिकतेच्या गप्पा ठाकरे गटाकडून मारल्या जात आहेत. मात्र नैतिकता शिल्लक असेल तर ठाकरे गटात उरलेल्या शिवसेना आणि भाजपच्या एकत्रित मतांवर निवडून आलेल्या आमदारांनी आधी राजीनामा द्यावा. तुमच्या पाठिशी लोक असतील तर निवडणुकांना सामोरे जा, निवडून या आणि मग नैतिकतेच्या गप्पा मारा, असे आव्हान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.

निवडणूकीची खुमखुमी असेल तर राजीनामा द्याच आणि...; श्रीकांत शिंदेंचे ठाकरे गटाला आव्हान
समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; सीबीआयचा घरावर छापा

नैतिकतेच्या गप्पा करणाऱ्यांनी २०१९ मध्ये भाजप सोबत निवडणूक लढवली. एकत्रितपणे लोकांच्या समोर गेले, बॅनरवर फोटो लावले आणि युतीत निवडणूक आले. पण त्यानंतर मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसायला लागली. त्यासाठी दुसऱ्यासोबत संसार थाटला. नैतिकता असती तर दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले नसते, असा घणाघात शिंदे यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात विधानसभा अध्यक्षांची निवड वैध ठरवले आहे. त्यांना अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आता काही जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापेक्षा हे मोठे झालेत आहेत, अशी खिल्लीही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची उडवली.

काही लोक बरळत सुटले आहेत. ते आता राज्यपाल्याचे पद बरखास्त करा, अशीही मागणी करू लागल्याचेही डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. ठाकरे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतो. मात्र ते स्वतः मुख्यमंत्री पदावर बसले. निवडणुकीआधी केलेली युती नंतर तोडली ती नैतिकता होती का? ती जनतेसोबत गद्दारी आणि जनमताची प्रतारणा नव्हती का, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.

ठाकरे गटाकडे उरलेले आमदार, खासदार शिवसेनेत येणार आहेत. त्यांना थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवून संभ्रम पसरवला जातो आहे. ठाकरे गट जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. निकालाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सरकार पडणार म्हणून सातत्याने खोट पसरवलं जाते आहे. आपल्या बाजूने सहानभूती मिळावी यासाठी हे खोटे बोलण्याची वेळ ही त्यांच्यावर आली आहे, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com