शिवसेना संपतेय, काँग्रेससह मनसे, राष्ट्रवादीने.. ; जेपी नड्डांचा इशारा
नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. एका बाजुला ईडीची कारवाई सुरु असताना दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, राज्यात फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील, असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय वातवारण आणखी तापण्याची चिन्हे आहे.
बिहारमध्ये भाजपच्या १६ कार्यालयांच्या उद्घाटन समारंभा जेपी नड्डा यांच्या हस्ते झाला. यावेळी ते म्हणाले, आमची खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीशी आहे. कॉंग्रेस 40 वर्षानंतरही आमच्यासोबत सामना करू शकत नाही. आमच्यासारखा पक्ष दोन दिवसांत बनत नाही. आमच्या पक्षाची विचारधारा इतकी मजबूत आहे की 20 वर्षे इतर पक्षात राहून लोक आमच्या पक्षात येतात.
भाजपशी सामना करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही. महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, राज्यात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा नड्डा यांनी केला आहे. शिवसेनेसह मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीने सावध राहावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, भाजपला शिवसेना संपवायची आहे, असा आरोप संजय राऊत यांच्यासह अनेकांनी सातत्यानं केला होता. त्यातच आता शिवसेना संपतेय, असं वक्तव्य जेपी नड्डा यांनी केले आहे. संजय राऊतांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य आल्याने राजकीय वर्तुळात टीकेला आता आणखी धार लागणार यात शंका नाही.