आव्हाडांवरून अंधारेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कारकिर्दीचे...
राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकारी महिलेच्या आरोपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. त्यावरच अनेक राजकीय मंडळींची प्रतिक्रिया येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.
काय म्हणाल्या अंधारे?
आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहे. त्यावरच बोलताना अंधारे म्हणाल्या की, या गोष्टीचा राग किती मनात असावा, तो राग इतका वाईट पद्धतीने काढावा. की मुख्यमंत्र्यांनी रिधा रशीद यांच्या सांगण्यावरून विनयभंगचा गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्रातील राजकारणाचा स्थर किती खाली जाऊ शकतो, त्याचे हे उदाहरण आहे. काल घडलेला माझासोबतचा प्रकार किंवा आज घडलेला आव्हाडांबाबतचा प्रकार असेल. असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आव्हाडांचा तो व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघतील तर त्या व्हिडिओनुसार इतका गंभीर आरोप करताना मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कारकिर्दीचे थोडे पण काही वाटले नाही का? लोक काय विचार करतील काय बोलतील असे का वाटले नाही. असा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे जोरदार प्रहार केला आहे.