'रत्नागितीमध्ये मिमिक्री आर्टिस्टची सभा' महाडमधल्या सभेत अंधारेंची राज ठाकरेंसह शिंदे गटावर जोरदार टीका
महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाची शिवगर्जना सभा होत आहे. या सभेकडे सर्वांचेच लक्ष आहे. याच महाडच्या सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंसह शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या अंधारे?
महाडच्या सभेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाला की, एमाआयडीसीमधील भंगार विकून खाणाऱ्यांना जागा दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी दिले. महाड एमआयडीसीमधील यांची दादागिरी मोडून काढा. येत्या काळात स्नेहल जगताप महाडकरांच्या काळजात राहणारे नाव असेल, असेही त्या म्हणाल्या.
भाजपने बारसु प्रकल्प करण्याचा घाट घातला आहे. लोक कुणाच्या सोबत आहेत हे आज बारसुमध्ये सिद्ध झालं. पुढे बोलतांना त्यांनी भरत गोगावले यांच्यावर आसूड ओढला. भरतशेठला त्यांची जागा दाखवली पाहिजे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.
पुढे त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, आज रत्नागितीमध्ये मिमिक्री आर्टिस्टची सभा आहे, आमचं हिंदुत्व हे हिंदुंना रोजी-रोटी देणारं हिंदुत्व आहे. त्यामुळे कुणीही आम्हांला हिंदुत्व सांगू नये. अशी बोचरी टीका त्यांनी केली.