Sushma Andhare | Eknath Shinde
Sushma Andhare | Eknath ShindeTeam Lokshahi

सुषमा अंधारे यांची मुख्यमंत्री शिंदेवर बोचरी टीका, शिंदे दिलेल्या चिठ्ठ्यांवर बोलतात...

मी राष्ट्रवादीची कधीही सदस्य नव्हते, तरीही गुलाबराव पाटील म्हणतात, मी राष्ट्रवादीतून आले. भाजपकडे स्वतःचे असे काय होते?
Published by :
Sagar Pradhan
Published on

शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षाच्या मोर्चे बांधणीसाठी सध्या राज्यभरात महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. या महाप्रबोधन यात्रेची जवाबदारी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडे देण्यात आली आहे. या महाप्रबोधन यात्रेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर मधील महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला आहे.

Sushma Andhare | Eknath Shinde
मुख्यमंत्री शिंदेंची भेटीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, नवं राजकीय समीकरण...

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

कोल्हापूर येथील महाप्रबोधन यात्रेत बोलताना अंधारे म्हणाले की, महाराष्ट्रातून 7 प्रकल्प बाहेर गेले, लाखो लोकांचे रोजगार गेले. गुजरातला प्रकल्प नेऊन मुंबईला दुबळे करून गुजरातला ड्रीम सिटी करायचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.सोबतच महाराष्ट्रामध्ये जातीचे राजकारण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शिवसेनेतून अनेकजण आले गेले, पण शिवसेनाला काही फरक पडला नाही, राज ठाकरे, भुजबळ यांनी शिवसेना संपवायचा कधी प्रयत्न केला नाही. मोदी टेलिप्रॉम्प्टरवर बोलतात आणि एकनाथ शिंदे फडणवीसांनी दिलेल्या चिठ्ठ्यांवर बोलतात, असा टोलाही त्यांनी शिंदेंना यावेळी लगावला.

मी राष्ट्रवादीची कधीही सदस्य नव्हते, तरीही गुलाबराव पाटील म्हणतात, मी राष्ट्रवादीतून आले. भाजपकडे स्वतःचे असे काय होते? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लेकरांना मांडीवर घेऊन भाजपने त्यांना मोठे केले. खोके शब्द उचारला, तर कायदेशीर कारवाई करणार असे म्हटले जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com