Sushama Andhare | Abdul Sattar
Sushama Andhare | Abdul SattarTeam Lokshahi

अब्दुलभाई अल्लाहाताला से तो डरिये, सुषमा अंधारेंचा सत्तारांना टोला

'सौ चूहे खा के बिल्ली चली हज को', हे अब्दुल सत्तार यांना शोभा देत नाही.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. अशातच शिंदे गट आणि ठाकरे गट असा वाद उफाळून येत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 'सौ चूहे खा के बिल्ली चली हज को', अशी काही परिस्थिती अब्दुल सत्तार यांची झाली असल्याचा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी सत्तारांना लगावला आहे.

Sushama Andhare | Abdul Sattar
कंटेनर भरून खोके कुणी पचवले, हे समोर येईलच; शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

रश्मीताई ठाकरे यांना मुख्यमंत्री करा म्हटल्याने आम्हाला मंत्रालयातील सहावा मजला पाहायला मिळाला नसल्याची टीका सत्तार यांनी केली होती. यावरच प्रत्युत्तर देताना अंधारे म्हणाल्या की, मला अब्दुल सत्तार यांच्या अभिनयाचं कौतुक वाटते. माझ्या हातात काही शक्ती असते तर सत्तार यांना मी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार दिला असता. एवढा खोटा बोलणार माणूस आहे. एकदा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना असा प्रवास करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा कोणत्याच पक्षाची ईमान नाही. त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात विश्रामगृहाची सोय नाही, रस्ते नीट नाहीत. सत्तार यांनी स्वतःच्या मतदारसंघात निव्वळ आणि निव्वळ ज्याला अत्यंत असभ्य व असंस्कृतपणाचा कळस गाठला आहे. त्यांनी अशी विधान करायची. म्हणजे 'सौ चूहे खा के बिल्ली चली हज को', हे अब्दुल सत्तार यांना शोभा देत नसल्याचा अंधारे म्हणाल्या.

Sushama Andhare | Abdul Sattar
पोलीस भरतीची वेबसाईट जाम, विद्यार्थी बेहाल

पुढे त्या म्हणाल्या की, मी सिल्लोडमध्ये जाऊन बोलले असता भाजपच्या काही आमदारांनी मी अल्लाह-बिस्मिल्ला करत असल्याच्या टीका केल्या. पण ज्यांना जी भाषा कळते त्या भाषेत मी त्यांना उत्तर देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आमचे अब्दुल सत्तार हिंदुत्वासाठी गेले आहेत तर ते कामाख्या मातेच्या मंदिरात दर्शनासाठी का गेले नाहीत. जर ते कामाख्या मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जात नसतील तर ते इस्लाम धर्माच्या परंपरावर चालत आहे. पण तरीही ते कृषी प्रदर्शनामुळे कामाख्याला गेलो नसल्याचं म्हणत असतील तर, किमान 'अब्दुलभाई अल्लाहाताला से तो डरिये' असा टोला अंधारे यांनी लगावला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com