'अजूनही मातोश्रीचा धसका कायम' उध्दव ठाकरेंवर शाहांनी केलेल्या टीकेला राऊतांचे जोरदार प्रत्युत्तर
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची नांदेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडतानाच शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावरून उध्दव ठाकरेंना काही सवाल केले. त्यावरच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय दिले राऊतांनी प्रत्युत्तर?
अमित शाहांच्या टीकेला संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले,गृह मंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका, मजेशीर आहे. मला प्रश्न पडला आहे. हे भाजपाचे महा संपर्क अभियान होते की. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे खास आयोजन. असा टोला त्यांना लगावला.
पुढे ते म्हणाले की, अमित भाई यांच्या भाषणातील २० मिनिटात ७ मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजूनही मातोश्रीचा धसका कायम, शिवसेना फोडली, नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिले. तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे.ये डर अच्छा है.जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने त्यावर चिंतन करायला हवे.पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले.एवढा धसका घेतलाय. असे प्रत्युत्तर राऊतांनी दिले.