...अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भाजप किंवा मिंधे गटात गेले, उद्धव ठाकरेंचा घणाघात
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ही जयंती साजरी केली जात आहे. मात्र, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जयंतीवरून चांगलीच जुंपलेली दिसली. त्यातच आज विधान भवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचा अनावरण होत आहे. तर दुसरीकडे मुंबईत षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. याच मेळाव्यात बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
षण्मुखानंद सभागृहात बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तेच चैतन्य, तोच उत्साह आणि तीच गर्दी पाच-दहा मिनिटंच बोलणार आहे गद्दार विकले जाऊ शकतात. ते खोक्यांनी विकले किंवा घेता येऊ शकतात. पण जे आहे ते विकलं किंवा विकत घेता येऊ शकत नाही. नेत्याला एखादी माहिती पडते आणि पक्षप्रमुखाला पडत नाही असं थोडीना होतं? संजय तुला पोलंडचा पंतप्रधान भेटला, मला तर थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. मला म्हणाले की, मी आज इथे आलो, उद्या मी भाजपात चाललोय. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरावर रेड पडली आणि कागदपत्रे सापडली अशी बातमी ऐकलीय. मग लगेच आपल्या इथल्या खोकेविरांनी सांगितलं की, अरे तू कसं जगणार? न झोपेचा पत्ता, न कसलं काही. भाजपात ये किंवा मिंधे गटात ये, बघ सगळं मस्त. हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं आहे. त्यामुळे उद्या कदाचित बातमी येण्याची शक्यता आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भाजप किंवा मिंधे गटात गेले. अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली.
आज प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत
पुढे ते म्हणाले की, आज प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले एकत्र आले होते. पण त्यानंतर ते भाजपच्या कळपात गेले. आज दोन्ही वारसाचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. दोघं नातू एकत्र आल्यानंतर जे डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझं काही काम नाही. कारण देश हुकूमशाहीच्या दिशेला चाललं आहे. हिंदुत्व सगळं थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारावर धोक्याची भींत उभी करायची आणि त्याआडून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची. ती असी बसवायची तुम्ही हु का चू केलं तर याद राखा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्या कलाकाराने ते चित्र चितारलं असेल त्यांचा मला अपमान करायचा नाही
मी शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याला वंदन करुन आलो. त्यांचा आज जन्मदिवस. आज सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा जन्मदिवस. आज तिकडे विधान भवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. मला विचारतात की त्या तैलचित्राचं काय? मी म्हटलं ते बघितलेलं नाही. ज्या कलाकाराने ते चित्र चितारलं असेल त्यांचा मला अपमान करायचा नाही. पण त्यांना पुरेसा वेळ दिला गेला असेल का? ते महत्त्वाचं आहे.
सरळसरळ वारसा हडपण्याचा प्रकार
घाईगडबडीत काहीतरी रंगवून घ्यायचं आणि हे तुझे वडील. तर अजिबात ते चालणार नाही. दुसऱ्याचे वडील चोरताना हे लक्ष ठेवा नाहीतर तेही तुम्ही विसरायचे. इकडे शिवसेनाप्रमुखांचा विचार, तिकडे मोदी का आदमी आणि तिकडे शरद पवार गोड माणूस. नक्की कोणाची बोटं लावणार तुम्ही? महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकार का पाडलं? तर हिंदुत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले. काल सांगतात की, शरद पवार खूप गोड माणूस. मी फोनवर त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो? ही अशी सगळी माणसी आहेत. तुमची कृती चांगली आहे. बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहेत. त्याचा अभिमान आहे. पण त्यामागचा हेतू वाईट आहे. जसं नेताजींच्या मुलीने सांगितलं, शताब्दी जरुर साजरी करा. पण त्यांचे विचार मान्य आहे का? त्या बोलल्या आहेत की, सरळसरळ वारसा हडपण्याचा प्रकार आहे. असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.