Uddhav  Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी खोक्यांवरून पुन्हा डिवचले; म्हणाले, खोक्यांचं राजकारण...

उद्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. त्यामुळे उद्या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर पांघरून घालण्याचे प्रयत्न करतील.
Published by :
Sagar Pradhan
Published on

जालन्यातील घनसावंगी येथील स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड संचलित संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.मात्र, यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर खोक्यावरून निशाणा साधला. खोक्यांचं राजकारण करायचं असेल तर लोकशाही संपली असं जाहीर करा असा खोचक टोला यावेळी त्यांनी लगावला.

Uddhav  Thackeray
पंतप्रधान मोदींच्या आधीच औरंगाबादेत समृद्धी महामार्गाचे उदघाटन करण्याचा प्रयत्न

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी निवडून दिलेल्या मताची किंमत खोक्यामध्ये होत नाही. आता आपल्याकडे गुप्त मतदान आहे. मात्र नागरिकांनी दिलेले मत त्यांना तरी माहित आहे का? कुणाकडे जाणार आहे आणि कुठून-कुठ्न जाणार आहे. ट्रॅव्हल एजन्सी सारखं सुरत, गुवाहाटी आणि दिल्ली असे कधी इकडे कधी तिकडे असे मतदान मतदारांपासून गुप्त होऊ लागले आहेत. असे कसे चालणार. अशी लोकशाही आपण मानणार नाही. त्यामुळे लोकशाहीचा अर्थ असा लावणार असेल तर देशातील लोकशाही संपली असे एकदा जाहीर करून टाका. तुम्ही कोणालाही मतदान केले तर त्याला आम्ही खोक्यात बसून आमच्याकडे घेऊन टाकू अशी परिस्थिती असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा

उद्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. त्यामुळे उद्या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर पांघरून घालण्याचे प्रयत्न करतील. शिवाजी महाराज की जय म्हणतील. मग आम्हाला टोमणे मारतील की, बाळासाहेब ठाकरे कसे होते. पण माझी त्यांना एक विनंती आहे की, तुम्ही देशाचे पालक असून पालकांसारखं बोलावे. महाराष्ट्र पालकाची भाजी आहे असे समजून बोलू नका, कोणेही यावे आणि आमची भाजी करावी एवढे आम्ही मिंदे नाही असेही ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com