Sanjay Shirsat
Sanjay Shirsat Team Lokshahi

'राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील, याला शरद पवारांची मुक संमती' संजय शिरसाटांचा दावा

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम वाजवायचा होता तो वाजवलेला आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहत नसून, त्यासाठी ते कुणाबरोबरही युती करण्यात तयार असतात.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार हे मविआत नाराज असल्याच्या चर्चा देखील बातम्या समोर आल्या. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती. त्या बैठकीत नक्की काय घडलं? याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज मोठा खुलासा केला. भाजपाबरोबर जाण्यासाठी कुटुंबाला लक्ष्य केलं जात आहे. कुणाला व्यक्तिगत निर्णय घ्यायचा असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण, पक्ष म्हणून आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही, त्यावरच आता प्रंचड गदारोळ सुरू झालाय. त्यातच आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे.

Sanjay Shirsat
नागपूरच्या सभेत भाषण करणार नाहीत; अजित पवार म्हणाले, आमचं आधीच ठरलं...

काय म्हणाले संजय शिरसाट?

एका माध्यमाशी बोलताना शिरसाटांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की,'उद्धव ठाकरेंना बोलवून शरद पवारांनी इशारा दिला असावा, असं माझं मत आहे. दीड तासांची बैठक चहा, पाणी करून किंवा एक वाक्य बोलून होत नसते. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम वाजवायचा होता तो वाजवलेला आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहत नसून, त्यासाठी ते कुणाबरोबरही युती करण्यात तयार असतात. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांना राहायचं नाही. त्यांचा कल भाजपाकडे आहे. म्हणून ते भाजपाबरोबर जातील. राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील. कारण, याला शरद पवारांची मुक संमती आहे. अजित पवार, प्रफूल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शाहांबरोबर ८ एप्रिलला ठरवून बैठक केली. उद्या राष्ट्रवादी भाजपाबरोबर आल्यास नवल वाटण्यासारखं काहीच नाही, असा खळबळजनक दावा शिरसाटांनी केला.

पुढे ते म्हणाले, 'अजित पवारांना त्यांची कातडी वाचवायची आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांचीही ईडी चौकशी सुरु आहे. मग, यांना भीती नाही का? फक्त तुम्हालाच भीती आहे का? हे सर्व खोटं आहे. मात्र, आम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही. भाजपाने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. असे देखील शिरसाटांनी यावेळी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com