Sharad Pawar | Eknath Shinde
Sharad Pawar | Eknath Shindeteam lokshahi

सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात

शिंदे यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष
Published by :
Shubham Tate
Published on

Sharad Pawar : विधानपरिषद (vidhan parishad) निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत कॉंग्रेसच्या एका उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला. निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) उमेदवारांनाही काठावर मतं मिळाली. म्हणजेच शिवसेना आणि कॉंग्रेसची (Congress) मतं फुटल्याचे स्पष्ट झालं आहे. आज शिवसेनेच्या पहिल्या फळीतील मोठे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक शिवसेना आमदार नॉटरिचेबल असून ते सूरतमध्ये असल्याची माहिती आहे. (shivsena mla are in surat sharad pawar called meeting mhod)

दरम्यान, हे सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापले आहे. (shivsena mla are in surat sharad pawar called meeting mhod)

Sharad Pawar | Eknath Shinde
एकनाथ शिंदेंची सूचक फेसबुक पोस्ट, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद धोक्यात?

शिंदे यांच्यासोबत कोकण, ठाणे आणि औरंगाबादमधील सहा आमदार नॉट रिचेबल आहेत. दोन विद्यमान मंत्र्यांसोबत शिंदे हे सुरतला आले असून आज दुपारी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आज ठाकरे सरकार संकटात सापडल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपमध्ये (bjp) प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com