Sushma Andhare | Chitra Wagh
Sushma Andhare | Chitra WaghTeam Lokshahi

सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना टोला; म्हणाल्या, अरेच्च्या विसरलेच...

स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील पूजा चव्हाण सारख्या एका माऊलीच्या अब्रूचं खोबरं उधळणाऱ्यांनी आधी मंत्रिमंडळात बसून अचकट विचकट बोलणाऱ्या मंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडत असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हे सर्व चालू असताना आता भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरु असल्याचं चित्र आहे. आज नवी मुंबईत माध्यमांशी बोलत असताना चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंवर टीका केल्यानंतर त्यावरच आता सुषमा अंधारे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.

Sushma Andhare | Chitra Wagh
आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; म्हणाले, माध्यमांसमोर दोघं एकत्र चर्चेला सामोरं जाऊ...

काय म्हणाल्या सुषमा अंधारे ट्विटमध्ये?

स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील पूजा चव्हाण सारख्या एका माऊलीच्या अब्रूचं खोबरं उधळणाऱ्यांनी आधी मंत्रिमंडळात बसून अचकट विचकट बोलणाऱ्या मंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना चिमटा काढलाय. “अरेच्च्या विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाहीय”, अशी बोचरी टीकाही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

काय केली होती चित्रा वाघ यांनी टीका?

“प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आमची नक्कल करून अंधारे टाळ्या आणि शिट्ट्या मिळवतात. मात्र, मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काय दिवे लावले, हे त्यांनी महाराष्ट्राला सांगावे. त्यांच्या प्रत्येक विधानावर बोललेच पाहिजे, असे काही नाही. त्या त्यांचे काम करत आहेत. आम्ही आमचे काम करत राहू. असे कितीही आडवे आले तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्हाला आमची कामे आहेत.” असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com