स्वतःची नाती ठेवायची झाकून, बाळासाहेबांच्या घराण्याकडे पाहायचं वाकून, पेडणेकर यांची शिंदे गटावर विखारी टीका
सध्या राज्यात राजकीय गोंधळ सुरु असताना, अशातच शिवसेना आणि शिंदे गटाची दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मात्र या दरम्यान, काल शिंदे गटातील युवा सेनेची कार्यकारणी जाहीर झाली आहेत. यात अनेक आमदारांच्या मुलांना संधी मिळाल्यामुळे या कार्यकारणीवर जोरदार टीका होत आहे. यावर माजी मुंबई महापौर शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी भाष्य करत ताशेरे ओढले आहे.
काय म्हणाल्या पेडणेकर?
बंडखोर आमदारांनी बंडखोरीनंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीचे अनेक आरोप केले. मात्र आता शिंदे गटातील युवासेनेचा संदर्भ घेत पेडणेकर यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण, स्वतःची नाती ठेवायची झाकून आणि बाळासाहेबांच्या घराण्याकडे पाहायचं वाकून, अशी जहरी टीका करत त्या म्हणाल्या की, आदित्य ठाकरे हे जरी बाळासाहेबांचे नातू असले तरी यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून कामाला सुरू केलं आहे, त्यांचा झांजवत, त्यांची काम करण्याची पद्धत सर्वांनी पहिली आहे, त्यांच्यावर मुद्दाम आरोप केले जात आहे, याने त्यांचे तेज झाकोळून जाणार नाही, उलट अधिक तेजाने आदित्य उजळून निघेल. असे विधान यावेळी त्यांनी केले आहे.
नार्वेकर असे काय करतील असे मला वाटत ना
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मित्र निकटवर्तिय मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरच बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, याला गौप्यस्फोट म्हणता येणार नाही, खूप जणांना वेगवेगळ्या गोष्टींनी ट्रॅप केले जात आहे, मिलिंद नार्वेकर असे काय करतील असे मला वाटत नाही, कारण नारायण राणे राज ठाकरे यांनी देखील जेव्हा त्यांच्यावर आरोप केले त्यातून ते तावून सुलाखून निघाले, सध्या ते तिरुपती संस्थांचे सदस्य आहेत त्यामुळे ते असे काय करतील असे वाटत नाही, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.