राजकारण
तिढा सुटला? शिंदेंचा दसरा मेळावा क्रॉस, ओव्हल मैदानावर होणार; मंत्री केसरकरांनी सांगून टाकलं
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? यावरुन राजकारण तापले होते.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? यावरुन राजकारण तापले होते. तसेच अनेक प्रतिक्रिया देखिल येत होत्या. याच पार्श्वभूमीवर आता मंत्री दीपक केसरकर यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यामुळे आता शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही. विकासाचं राजकारण करतो. त्यामुळेच वादात न जाता शिवाजी पार्कऐवजी दुसरं मैदान आम्ही घेतलेलं आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार आहे.ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो. असे दिपक केसरकर पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.