हिंदू जन आक्रोश मोर्चेच्या मागण्यांची दखल सरकार नक्की घेईल : शिवेंद्रराजे भोसले
पुणे : धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा. या मागणीसाठी पुण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात आमदार शिवेंद्र राजे भोसले सहभागी झाले आहेत. हिंदू समाजाला जे भीतीचे वातावरण आहे. त्या भीतीला वाचा फोडण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले आहेत.
शिवेंद्र राजे भोसले म्हणाले की, हिंदू समाजाला जे भीतीचे वातावरण झाले आहे त्या भीतीला वाचा फोडण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात येतो आहे. प्रत्येक तालुक्यात शहरात हा मोर्चा होतो आहे. मोर्चेच्या मागण्यांची दखल सरकार नक्की घेईल. केंद्रात मोदी यांचे सरकार आहे, राज्यात आमचे सरकार आहे. त्यामुळे या मोर्चेच्या मागण्यांची दखल नक्की घेण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये धर्माचे रक्षण करणे हा देखील भाग होता. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आमच्या धर्माचा रक्षण करतोय. आत्तापर्यंत आपण जो इतिहास वाचला आहे. त्यात छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीर म्हणूनच आहे. त्यामुळे यावर चर्चा होऊ नये असं माझे मत आहे. आपल्याला लहानपणी देखील संभाजी महराज हे धर्मवीर आहे असच शिकवलं आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.