सावरकरांबद्दल केलेल्या विधानानंतर शिवानी वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ते चुकीचं...
काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलत असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावकरांबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. या वक्तव्यावरून राजकारण प्रचंड तापले होते. त्यावरच आता विधान केल्यानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी सावकरांबाबत जे काही बोलले ते चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
नेमकं काय म्हणाल्या शिवानी वडेट्टीवार?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यावादावर भाष्य केले त्या म्हणाल्या की, 'संविधानाने मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार मी माझे विचार मांडू शकते. मी सावकरांबाबत जे काही बोलले ते चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात, मी माझे विचार मांडले', असे मत त्यांनी यावेळी मांडले.
पुढे त्या म्हणाल्या की, 'काँग्रेस पक्ष नेहमीच सत्याच्या बाजुने उभा राहिला आहे. माझ्या व्हिडीओनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांचा मला पाठिंबा मिळणं, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे एक उर्जा मिळते', असे प्रतिक्रिया शिवानी वडेट्टीवार यांनी दिली.
काय केले होते शिवानी वडेट्टीवार यांनी वक्तव्य?
हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा कधीच मोर्चा काढणार नाही. कुठला मोर्चा काढतात? सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात. सावरकर मला आणि माझ्यासोबत महिला, भगिनी उपस्थित आहेत. सर्वांना भीती वाटत असेल कारण की सावरकरांचे विचार होते. सावकर म्हणायचे, की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हा तुम्ही आपला राजकीय विरोधकांविरुध्द वापरलं पाहिजे. मग, माझ्या सारख्या इथे उपस्थित महिला-भगिनींना कसं सुरक्षित वाटेल. आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात, असे विधान शिवानी वडेट्टीवार यांनी केले होते.