LIVE: एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरूवात
एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे
- शिवसैनिकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार
- शिवसैनिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साष्टांग दंडवत घातले.
- छत्रपती शिवाजी महाराज की जय ने भाषणाला केली एकनाथ शिंदे यांनी केली सुरूवात
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांना मानाचा मुजरा
- आनंद दिघे साहेबांसमोर नतःमस्तक होतो
- विधानसभेचे मुख्यप्रतोद भरत गोगावले
- वर्धापन दिनाच्या दिल्या सर्वांना शुभेच्छा
- हे वर्ष अभूतपूर्व वर्ष होते, २० जूनला आपण क्रांतिला सुरूवात केली.
- जगातील अनेक देशांनी आपल्या क्रांतिची दखल घेतली.
- हा वर्धापनदिन मानाचा उत्सवाचा आहे.
- तेच टोमणे, तेच आरोप, उद्धव ठाकरे यांनी स्क्रिप्ट रायटर तर बदलावे
- आरोपाला उत्तर कामाला देणार, हेच बाळासाहेबांनी शिकवले आहे.
- अनेक नेत्यांच्या कष्टातून आणि रक्तातून शिवसेना घडवली आहे.
- फाटक्या लोकांना घेऊन शिवसेना मोठी केली.
- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांची डरकाळी फुटली की देश स्तब्ध व्हायचे
- किती तरी लोकाचे जीव गेले शिवसेना वाढविण्यासाठी
- उद्धव ठाकरे कुठे होते, तुमच्यावर किती केसेस झाले आहेत.
- हा रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, हा बाळासाहेबाच्या शिकवणीमुळे झाला.
- श्रीकांत शिंदे याने हॉस्पिटल काढण्याची मागणी केली पण त्याची इच्छा पूर्ण करू शकलो नाही
- कर्ज काढून निवडणूक लढवली.
- बेळगावच्या जेलमध्ये ४० दिवस होतो.
- लोकसभेची निवडणूक होती माझी आई आजारी होती. आईचा जीव गेला, सभा पूर्ण केली आणि आईचे अंतीम दर्शन घडले. (एकनाथ शिंदे झाले भावूक)
- दुःखाचा डोंगर कोसळला. तेव्हा दिघे साहेबांचे शब्द आजही माझ्या कानात आहे. एकनाथ तुला अनेकांचे अश्रू पुसायचे आहेत.
- नेते मंत्री सांगतात थोडे आराम करा, पण शिवसेनाप्रमुखांचा
- वाघ डरकाळी फोडत नाही, तो पर्यंत कोल्हेकुई सुरू राहते. पण डरकाळी फोडली की कुठे पळा
- क्रांती करायलाही वाघाचं काळीज लागते.
- ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांना सहानुभूती मिळणार नाही.
- जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर 50 आमदार, 16 खासदार, शेकडो, लाखो कार्यकर्ते आमच्या आले नसते.
- शिवसेनेचा धनुष्यबाण तुम्ही गहाण ठेवले होते, ते सोडवण्याचे काम आम्ही केले.
- सरकार कोणाचं चालवत कोण होत, हे जर असच चालू असत तर आपण वाचलो नसतो.
- त्यामुळे आपल्याला अधिकृत शिवसेना धनुष्यबाण दिलं.
- किती खोटारडेपणा करायचा, आता जनता तुम्हाला साथ देणार नाही.
- तुम्ही सरकार चालवायचं सोडून गाडी चालवत होतात.
- अडीच वर्षात जेवढ्या सह्या झाल्या नाही, तेवढ्या मी एका दिवसात केला.
- आधीचे मुख्यमंत्री पेन ठेवत नव्हते. माझ्याकडे दोन पेन आहेत.
- बघतो, करतो, आणतो असं काम करणारं सरकार नको.
- याच रिक्षाने तुमच्या मर्सिडिजला खड्यात घातलं.
- आम्ही काम करत राहू आणि तुम्ही आरोप करत राहा.
- मी गावाला गेलो तेव्हा आरोप केले, तुम्ही तर दोनदाच मंत्रालयात गेले.
- हे आम्ही नाही म्हणत शरद पवारांनी पुस्तकात लिहलं आहे.
- मी त्यांना सांगायचो कार्यकर्ते मोठा करा, त्याशिवाय पक्ष मोठा होत नाही.
- लोकं सोडून जातात याचं आत्मपरिक्षण करा.
- मला अभिमान वाटला ज्या लाल चौकात तिरंगा फडकला.
- आणि त्याच लाल चौकात एकनाथ शिंदेचे पोस्टर झळकले.
- गद्दार कोण, विश्वासघाती कोण हे जनतेला माहित आहे.
- काल मोदी, शाह यांच्यावर टीका केली, तुम्ही कुठे ते कुठे?
- एक नोटीस पाठवली तर लेंडी पातळ झाली. मोदी- शाहांकडे पळत गेले
- मोदी साहेबांनी पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केली. तुम्ही त्यांनी मणिपूरला जाणाच्या गप्पा करता.
- तुम्ही वर्षावरून कधी मंत्रालयात गेले नव्हते.
- सरकार गेल्यावर ठाकरे तरातरा चालायला लागले, ही कोणाची करामत आहे माहिती आहे का? या डाॅ. एकनाथ शिंदेची.
- मुंबई तोडण्यावरून राजकारण करताय.
- गिरणी कामगारांनी शिवसेना मोठी केली, तुम्ही त्यांना घरं देऊ शकले नाही.
- मुंबईतून बाहेर गेलेल्या लोकांना आम्ही पुन्हा मुंबईत आणणार.
- आतापर्यंत त्यांनी फेसबूक सरकार चालवलं पण आपलं फेस टू फेस काम असतं.
- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होतं तेव्हा बाहेरच्या गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरवर होता.
- महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गुजरात एक नंबरवर आले.
- उद्यापासून क्रांती दिन साजरा करू आणि या गद्दारांना धडा शिकवू.
रामदास कदमांची उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका
- संजय राऊत मुलीच्या डोक्यावर हात ठेवून सांग तू शरद पवार यांचा की उद्धव ठाकरे यांचा
- सकाळपासून टीव्हीवर संजय राऊतच दिसतो
- शिवसेना वाढविण्यासाठी किती जणांचे संसार उद्धवस्थ झाले - रामदास कदम
- संजय राऊत हा फक्त जॅकेट घालून फिरतो.
- उद्धव ठाकरे तुम्ही संपलात
- उद्धव ठाकरे तुम्ही गद्दार आहात
- २० जून हा गद्दार दिन नाही तर खुद्दार दिन असेल
- शिवसेना प्रमुखांचे स्वप्न आपला साकार करायचे आहे.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून गुलाबराव पाटलांची ठाकरे गटावर टीका
बाळासाहेबांनी दिलेली शिकवण जिवंत राहावी म्हणून आम्ही हा बंड केला - गुलाबराव पाटील
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाला सुरूवात
शिवसेनेच्या नेस्को येथील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाला सुरूवात
शिवसेनेतील दिग्गज नेते आणि मंत्री कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आता थोड्याच सुरूवात होणार आहे. यावेळी शिवसेनेतील सर्वच मंत्री, ज्येष्ठ नेते कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल
आज शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त शिवसेनेकडून कार्यक्रमाचे आयोजन केले. त्या कार्यक्रमाच्या सभास्थळी शिंदे दाखल झाले आहे.
साधारण एक वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. यावेळी दोन्ही गटाकडून शिवसेना पक्षावर दावा करण्यात आला. दरम्यान आता या बंडखोरीनंतर आज शिवसेनेचा पहिला वर्धापन साजरा होत आहे. परंतु, यंदा पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दोन कार्यक्रम पार पडत आहेत. ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. तर शिंदे गटाने गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.