शिवसेनेचा आरोप ठरतोय खरा; नोटाला सर्वाधिक मते
मुंबई : सत्तांतरानंतर आज पहिल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. यासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सहा फेरीचा निकाल हाती आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. परंतु, या निवडणुकीत ऋतुजा लटके विरुध्द नोटा असा सामना रंगताना दिसत आहे. यामुळे शिवसेनेने केलेला आरोप आता खरा ठरताना दिसत आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. यासाठी रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली येथील शाळेमध्ये मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीसाठी 81 हजार मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून ऋतुजा लटकेंनी आघाडी घेतली आहे. यामुळे लटकेंचा विजय जवळपास निश्चित मानण्यात येत आहे. परंतु, मतमोजणीदरम्यान अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते पडली आहेत. तर, निवडणुकीपुर्वीच शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी काही लोकांना नोटा दाबण्यासाठी नोटा दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता. हा आरोप आता खरा ठरताना दिसत आहे. सहाव्या फेरीचे निकाल हाती आले असून यातही नोटाला अधिक मते पडल्याची दिसून येत आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी सहावी फेरी निकाल
सहाव्या फेरीअंती एकूण
ऋतुजा लटके - 21090
बाळा नाडार - 674
मनोज नाईक - 398
मीना खेडेकर - 587
फरहान सय्यद - 448
मिलिंद कांबळे - 291
राजेश त्रिपाठी - 621
नोटा - 4338
एकूण - 28447