शिवसेनेकडून व्हिप जारी; शिंदेंसह बंडखोरांना होणार लागू?

शिवसेनेकडून व्हिप जारी; शिंदेंसह बंडखोरांना होणार लागू?

Assembly Speaker Election : भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे घोषित झाल्याने चुरशीची लढत होण्याची शक्यता
Published on

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) नामांकन दाखल करण्यात आले असून यासाठी शिवसेनेने (Shivsena) व्हिप जारी केला आहे. परंतु, एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदार व्हिप पाळणार का, याची उत्सुकता लागली आहे.

शिवसेनेकडून व्हिप जारी; शिंदेंसह बंडखोरांना होणार लागू?
राष्ट्रवादीला दणका! शिंदेंनी रोखली भुजबळांची 600 कोटींची कामे

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजसोबत नवीन सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, त्यांना तीन व चार तारखेला होणाऱ्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यातच आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला आहे. यासाठी शिवेसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवींनाच मतदान करण्याचे आदेश प्रतोद सुनिल प्रभू यांनी दिले आहेत.

शिवसेनेकडून व्हिप जारी; शिंदेंसह बंडखोरांना होणार लागू?
पोलिसांची दमदार कामगिरी; दोन गांजा तस्कारांना ठोकल्या बेडया

हा व्हिप एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांना बजावणार लागू असेल, अशी माहिती शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी याआधीच दिली होती. तर, शिवसेनेच्या व्हीपनुसार जर बंडखोर आमदारांनी मला मतदान केलं नाही. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते राजन साळवी म्हणाले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे घोषित झाल्याने चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com