Maharashtra Political Crisis : ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भविष्यात...
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर 21 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाकडून होणारी ७ सदस्यांचे घटनापीठ नेमण्याची मागणी फेटाळली आहे. यावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली असून शिवसेना नेते अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.
सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. जे 8 मुद्दे ठरवले होते. त्यातल्या एका मुद्यावर सुनावणी अडीच दिवस झाली. बाकीच्या मुद्यांवर युक्तीवाद सुरु होईल. त्यानंतर ते निर्णय घेतील. प्रत्येकाचा अर्थ काढून जजमेंट द्यायचा असतो. जे मागे तीन घटनापीठ होते ते आता पाच न्यायधीशांचे झाले आहे. भविष्यात कुठलाही निर्णय ग्राह्य धरावा यासाठी मोठ्या बेंचकडे जाणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट कायद्याने झाली पाहिजे. पूर्ण व सारासार विचार करुन निर्णय घेतला पाहिजे. कुठलेही मुद्दे राहिले नाही पाहिजे. जितका वेळ घेतला तो मान्य आहे.
तर, उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळकाढू धोरण राबवत आहे. त्यासाठीच त्यांनी विस्तारीत घटनापीठाची मागणी केली, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यावर अनिल परब म्हणाले की, आम्ही वेळकाढूपणा करतच नाही आहोत. जे वेळ न्यायाधीश देतात तेव्हा सगळं होतं, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, त्यांना शिवजयंती साजरी करताना मी पाहिलेली नाही. निवडणूका आल्या की त्यांना हे सगळं आठवतं. हे त्यांचं बेगडी प्रेम आहे. जे महाराजांच्या विरोधात बोलतात त्याच्यावर ते बोलत नाहीत. सरकार यंत्रणा त्यांना पाठिंबा देत आहेत