शिवसेनेने आ. संतोष बांगर यांचे चॅलेंज स्वीकारले, म्हणाले, पोलीस बंदोबस्त बाजूला सारून समोर यावं
काल अमरावतीच्या दौऱ्यावर असताना अंजनगाव सुर्जी येथे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर एकच राजकीय खळबळ सुरु झाली. माध्यमांसमोर हल्ल्यानंतर बांगर यांनी येऊन शिवसेनेला आव्हान केलं होत. त्यानंतर आता अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी बांगर यांचे आव्हान स्वीकारले आहे.
संतोष बांगर यांनी शिवसेनेला डिचवल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी संतोष बांगर यांच आव्हान स्वीकारत त्यांना चॅलेंज केलं हिम्मत असेल तर संतोष बांगर यांनी पोलीस बंदोबस्त बाजूला सारून समोर यावं व कधी येता किती लोक घेऊन येता वेळ, काळ ठरवा, तेव्हा दाखवेल तुम्हाला ओरिजनल बाळासाहेबांचा शिवसैनिक कोण आहे दाखवतो. असं थेट आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी संतोष बांगर यांना दिले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये आमदार संतोष बांगर दाखल होताच संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला होता. 50 खोके एकदम ओके, गद्दार अशा घोषणा देत शिवसैनिक संतोष बांगर यांचा गाडीसमोर आडवे झाले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी गाडी थांबवली नाहीतर शिवसैनिकांनी गाडीच्या काचावर हाताने मारले होते.