शिवसैनिक फडणवीसांच्या घरावर करणार हल्ला? पोलीस बंदोबस्त वाढवला

शिवसैनिक फडणवीसांच्या घरावर करणार हल्ला? पोलीस बंदोबस्त वाढवला

महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आला आहे आणि त्याला जबाबदार भाजप आहे, असं आरोप केला जातो आहे आणि त्यामुळेच आता शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत
Published on

कल्पना नळसकर | नागपूर : एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमादारांचा वाढतच असून आता 40 पर्यंत पोहोचला आहे. यानुसार लवकरच एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसैनिक संतप्त झाले असून रस्त्यावर उतरला आहे. अशामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शिवसैनिक घरावरती चालून येणार अशी माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आला आहे आणि त्याला जबाबदार भाजप आहे, असं आरोप केला जातो आहे आणि त्यामुळेच आता शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. नागपूरमध्ये बबधवारपासून शिवसैनिकांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. आता शिवसैनिक देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर चालून येतील, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. यामुळे फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. पोलीस येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवून आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी १४४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे...शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक ५० आमदार आणि भाजपचे समर्थक ११४ आमदार असे मिळुन १६४ आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आपला हक्क दाखवू शकतात का यावर बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान त्यांनी विधिमंडळ गटनेता, पक्ष प्रतोद आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार हवे असलेले दोनतृतीयांश संख्याबळ या तांत्रिक मुद्द्यावर पूर्ण केले तर शिंदे गटाची बाजू कायद्याच्या कसोटीवर टिकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com