राजकारण
Shinde vs Thackeray : 'कोटा'वरुन शिंदे गट - ठाकरे गटामध्ये जुगलबंदी
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यातच विधानभवनाच्या परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जुगलबंदी झालेली पाहायला मिळाली. वैभव नाईक, संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्यामध्ये ही जुगलबंदी रंगली.
गोगावले, शिरसाट मंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे असं वैभव नाईक म्हणाले. तसेच वैभव नाईक यांच्याकडून भरत गोगावले यांना कोट घालण्याचा सल्ला देण्यात आला. मंत्रिपद मिळो न मिळो कोट घालाच. गोगावले-शिरसाट मंत्री बनावे,आमची इच्छा आहे. असे वैभव नाईक म्हणाले.
यावर भरत गोगावले म्हणाले की, अधिवेशन संपताना सांगतो की, वैभवची इच्छा असेल तर तो मंत्रिपदाचा कोट त्याला देता. वैभव आमच्याकडे आगमन करत असेल तर मी अजून थोडं थांबतो. 10 दिवसांची वेळ देतो, विचार कर. असे म्हणत गोगावले यांनी एक प्रकारे वैभव नाईकांना ऑफरच दिली आहे.