राज ठाकरे आणि पवारांच्या मागणीवर शिंदे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, सगळा प्रकार झाल्यावर काय...
अंधेरी पूर्व निवडणुकीवरून सध्या राजकारण एकदम ढवळून निघाले आहे. या निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गटा विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. तर, राज ठाकरे नंतर राष्ट्रवादी सर्वासर्वे शरद पवार यांनी सुद्धा निवडणुक बिनविरोध घ्यावी अशी मागणी केली आहे. त्यावरच आता शिंदे गटाची प्रतिक्रिया आलीय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटाच्या वतीने प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भूमिकेवर बोलताना उदय सामंत म्हणाले की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी की नाही याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करू असं फडणवीस म्हणाले आहे. त्यामुळे मला अधिक यावर काही बोलयच नाही आहे. असे सामंत यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शरद पवार यांनी ही मागणी आधीच केली असती तर बर झाले असते सर्व जण एकत्र बसले असते. यावर चर्चा झाली असती. निवडणुकीची सर्व प्रक्रिया झाल्यानंतर ही भूमिका मांडणे त्याचा काय फायदा. असे विधान त्यांनी शरद पवार यांच्या मागणीवर केले आहे.
ठाकरे गटाला टोला
ठाकरे गटाकडून अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध करावी. यासाठी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र लादली आहे. त्यानंतर यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, हिंम्मत असेल तर बिनविरोध करा असे नेहमी म्हंटल जात आहे. राज साहेबांनी आव्हान केले शरद पवारांनी सुद्धा आवाहन केले आहे. त्यानंतर त्यात हिंमत असण्याचे काही कारण नाही, ही कुठ्ली भाषा आहे, ही राज्याची राजकीय संस्कृती नाही, आरडाओरडा न करता शांतपणे सुद्धा बोलू शकता. असा टोला त्यांनी बोलताना ठाकरे गटाला लगावला आहे.
अडीच वर्षाचे काम मुख्यमंत्री शिंदेंनी १०० दिवसात केले आहे
सामन्यातून नुकताच मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावर प्रत्युत्तर देतांना सामंत म्हणाले, एखाद्या पक्षाचा गटाचे मुखपत्र विरोधकांचे कौतुक कसे करू शकता. तर सामना आम्हाला चांगल कस म्हणणार, सामनाने जर शिंदेंच कौतुक केलं तर लोकांना वाटलं सामना शिंदे सोबत आहे का? त्यामुळे ते कधीच बोलणार नाही. सामनाच्या टीकेत किती तथ्य आहे. हे जनतेला कामाततून दिसला आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी अडीच वर्षाचे काम १०० दिवसात केले आहे. असे जोरदार प्रत्युत्तर उदय सामंत यांनी यावेळी सामनाच्या टीकेवर दिले आहे.