Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गट नाराज; केंद्राकडं करणार तक्रार

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गट नाराज; केंद्राकडं करणार तक्रार

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपालांचं हे विधान राज्याचा अपमान करणार असून त्याबाबत केंद्र सरकारकडं आम्ही तक्रार करणार असल्याचं शिंदे गटाचे (Shinde group) प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी स्पष्ट केलं आहे. केसरकर म्हणाले, राज्यपालांनी जे विधान केलं आहे ते राज्याचा अपमान करणारं विधान आहे. राज्यापाल हे संविधानिक पद असून त्यांच्यासंदर्भात केंद्र शासनाला लिहिण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळं राज्यपालांकडून पुन्हा अशी विधान येणार नाही, याबाबत केंद्र शासन त्यांना कळवू शकतं.

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गट नाराज; केंद्राकडं करणार तक्रार
Maharashtra Government : शिंदे सरकारला एक महिना पूर्ण, मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप रखडला

मुंबईसाठी केवळ दोनच समाजाचं योगदान नाही

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले की, मुंबईच्या उभारणीत सगळ्याच समाजाचा वाटा आहे. मात्र, त्यातही मोठा वाटा मराठी माणसांचा आहे. मुंबईतील औद्योगिक उभारणीत मुंबईच्या उभारणीत पारशी समुदायाचे मोठं योगदान आहे. पारसी सामाजानं देखील मुंबईच्या औद्योगीत वाढीत मोठं योगदान दिलं आहे. पण एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांच्या योगदानाबद्दल बोलायचं असतं पण त्यांनी पैसा काढून घेतला तर मुंबईत काही शिल्लक राहणार नाही, असं म्हणणे म्हणजे मुंबईबद्दला अभ्यास केलेला नाही हे द्योतक आहे, असंही केसरकर यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी काय म्हटले?

गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. शुक्रवारी, मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई, ठाणेच्या विकासात गुजराती, मारवाडी समाजाचे मोठं योगदान आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com