अखेरच्या क्षणी आयोगासमोर शिंदे गटाकडून लेखी उत्तर सादर; केला मोठा दावा?
शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी बंडखोरी झाली. त्यामुळे शिवसेनेत दोन पडले. मात्र, हे दोन्ही गट शिवसेना आपलीच असा दावा करत आहेत. परंतु, यावरच निवडणुक आयोगासमोर दोन्ही गटाचा संघर्ष सुरु आहे. मागच्या सुनावणीत आयोगाने दोन्ही गटांना लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे. ठाकरे गटाने युक्तिवाद सादर केल्यानंतर अखेरच्या क्षणी शिंदे गटाकडून लेखी स्वरूपात म्हणणं मांडण्यात आला.
काय केला शिंदे गटाने युक्तिवाद?
अखेर शेवटच्या मिनिटाला शिंदे गटाचे वकील केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल झाले. ते धावत-धावत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले. तिथे त्यांनी शिंदे गटाचं लेखी म्हणणं मांडलं. शिंदे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगात शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाणावर दावा केला. एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपद हे घटनात्मक आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे अधिक आहे. निवडणूक चिन्ह देताना संख्याबळ विचारात घेतलं जावं असा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला.
काय केला होता ठाकरे गटाने युक्तिवाद?
२१ जूनपासून जो घटनाक्रम घडला, तो सर्व घटनाक्रम आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी युक्तिवादात केला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबरोबरच यापूर्वी निवडणूक आयोगापुढे झालेल्या सुनावणीतील मुद्द्यांचाही समावेश आहे. याचबरोबर शिंदे गटाने ज्या प्रकारे शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता, तो दावा नेमका कसा चुकीचा आहे, हे देखील आम्ही या युक्तिवादात सांगितलं.