Sanjay Raut | Eknath Shinde
Sanjay Raut | Eknath ShindeTeam Lokshahi

'रात्रीच्या गावठी ब्रँड असेल' राऊतांच्या आरोपावर शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर

एक सुपारी घेतली होती, शिवसेना संपवण्याची. राष्ट्रवादीकडून असेल कोण म्हणते शरद पवार साहेबांनी त्यांना सुपारी दिली होती.
Published by :
Sagar Pradhan
Published on

नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. आधीच चालू असेलल्या वाद या निर्णयामुळे आता आणखीच तीव्र झाला आहे. दुसरीकडे यावरूनच एकमेकांवर टीका सुरु झाली असताना यातच आता ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा झाल्याचा दावा त्यांनी केली आहे. असा आरोप राऊतांनी केला. याच आरोपावर आता शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

काय दिले शिंदे गटाने प्रत्युत्तर?

संजय राऊत यांनी केलेली आरोपावर उत्तर देतांना शिवसेना प्रवक्ते (शिंदे गट) नरेश मस्के यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारावा वाटतो. रात्रीची भांग असेल ,रात्रीच्या गावठी ब्रँड असेल ,कदाचित त्यांच्या बरळण्यावर वरती याचा परिणाम झाला आहे. मी वारंवार सांगतोय आमच्या ठाण्यामध्ये फेमस हॉस्पिटल आहे. संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यांना ट्रिटमेंटची गरज आहे. त्यांनी एक सुपारी घेतली होती, शिवसेना संपवण्याची. राष्ट्रवादीकडून असेल कोण म्हणते शरद पवार साहेबांनी त्यांना सुपारी दिली होती. शिवसेना संपवण्याची आणि त्यांनी त्यांचं काम फत्ते केलेलं आहे. लोकशाहीमध्ये न्याय जिवंत आहे आणि आता त्यांच्या विरोधात निर्णय दिला की, न्यायालयावरती टीका करणार. असे जोरदार प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com