'रश्मी ठाकरे पूर्वी बंद दाराआड राजकारण करत होत्या, आता जाहीरपणे करतील'

'रश्मी ठाकरे पूर्वी बंद दाराआड राजकारण करत होत्या, आता जाहीरपणे करतील'

रश्मी ठाकरे राजकारणात सक्रिय होण्याच्या चर्चांवर शिंदे गटाची प्रतिक्रिया
Published on

शुभम कोळी | मुंबई : ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आता थेट रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत. महिना अखेरीस त्या नाशिकचा दौरा करणार असून महिला मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करतील. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रश्मी ठाकरे पूर्वी बंद दाराआड राजकारण करत होत्या आता जाहीरपणे राजकारण करतील, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

'रश्मी ठाकरे पूर्वी बंद दाराआड राजकारण करत होत्या, आता जाहीरपणे करतील'
...तर पुरुषांना म्हसोबाची माळ म्हणणार का? सुषमा अंधारेंचे लोढांवर टीकास्त्र

रश्मी ठाकरे यांच्या विषयी मला फार आदर आहे. कदाचित त्या जाहीरपणे सभा घेत असतील त्यांचे स्वागत आहे. परंतु, रश्मी ठाकरे वहिनी कधी राजकारणात नव्हत्या. पूर्वी त्या बंद दाराआड राजकारण करत होत्या. आता जाहीरपणे राजकारण करतील. इतके सर्वकाही केलं तरी शिवसैनिकांच्या भावनामध्ये काही फरक पडणार नाही. त्यांचा विचार पक्का झालेला आहे. खुर्चीकरीता बाळासाहेबांचा हिंदुत्ववाद यांनी सोडला आहे, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील नरेश मस्के यांनी टीकास्त्र सोडले आहे. अजित पवार यांचा जो अपमान चालला आहे. ज्यावेळी अजितदादांचा शपथविधी होता ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी अजितदादा यांच्या फोटोला कसे काळे फासले होते. त्यांच्या नावाने कशा घोषणा दिल्या होत्या. त्यांच्या नावाने कशा शिव्या दिल्या होत्या. अशा प्रकारचा अपमान अजित पवारांचा केलेला कोणी विसरणार आहे का? असे म्हणत नरेश मस्के यांनी आव्हाड यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com