महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी शिंदे गटाची नवी चाल! निवडणूक आयोगाप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावरही दावा केला आहे. शिवसेना कुणाची या मुद्द्यावर आता निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरुही केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती दिली होती. याप्रकरणी शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात नवी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे आहे. परंतु, सर्वोच्च न्यायलयाने सुनावणीला स्थगिती दिल्याने शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यास 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु, त्याआधीच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला तातडीने ग्रीन सिग्नल द्यावा. यासाठी कोर्टाकडे विनंती करणार आहे. आज शिंदे गटाच्या वतीने वकील सर्वोच्च न्यायालयात मेन्शनिंग रिट याचिका करणार आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्षावर कोणाचा दावा खरा आहे, हे पाहण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला नोटीस बजावली होती. याविरोधातील शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. शिंदे गट बेकायदेशीरपणे संख्या वाढवून संघटनेत कृत्रिम बहुमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे याचिकेत म्हटले होते. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आधीच प्रलंबित आहे. हे प्रकरण न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट आहे त्याची चौकशी करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असेही ठाकरे गटाने म्हंटले होते.