प्राचार्य मारहाण प्रकरणावर बांगरांचे उत्तर; म्हणाले, सरकार आमचंच, आम्ही काय बांगड्या...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच काल शिंदे गट आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण काल शासकीय कॉलेजच्या प्राचार्यला संतोष बांगर यांनी मारहाण केली आहे. त्यावरून सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया येत असताना विरोधक यावरून आक्रमक झाले आहे. आता याच प्रकरणावर स्वतःहा संतोष बांगर यांनी उत्तर दिले आहे.
औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 2023-24 च्या आराखड्याची बैठकीसाठी आलेल्या असताना माध्यमांशी बोलताना बांगर म्हणाले की, सरकार आमचंच आहे, मात्र सरकारमध्ये राहून आवाज उठवावा लागतो. आम्ही काय हातात बांगडया घातल्यात का? अन्यायाविरोधात लढा देणे शिवसैनिकाच कर्तव्य आहे. त्या प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळे माहिलेवर अत्याचार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरीही चालेल. तसेच संबंधित महिलेची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून आम्ही गप्प बसलो आहे. अन्यथा प्राचार्यावरती गुन्हा दाखल झाला असता, असेही बांगर म्हणाले. तर घटना होऊन आठ दिवस झाले असताना त्या प्राचार्यांने माझ्यावर गुन्हा का दाखल केला नाही. असा देखील सवाल बांगर यांनी यावेळी केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे फक्त आमदार बांगरच नाही तर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.