बांगर यांनी केलेल्या मारहाणीनंतर केसरकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, अशा प्रकारं वर्तन...
शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे, वादग्रस्त कृतीमुळे कायम चर्चेत असतात. मात्र, आता काल ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शासकीय कॉलेजच्या प्राचार्यला संतोष बांगर यांनी मारहाण केली आहे. माहितीनुसार, ठेकेदाराचे कॅन्टीन बिल पास न केल्याचा रागातून त्यांनी ही मारहाण केली. त्यावरच आता शिंदे गट मंत्री आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले संतोष बांगर?
संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीनंतर माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले की, या प्रकरणी गृहमंत्रालय योग्य ती कारवाई करेल. आमच्यासाठी खासदार, आमदार आणि सर्वसामान्य नागरीक सारखेच आहेत. संतोष बांगर यांनी थोडा संयम राखला पाहिजे. ते हे एका पक्षाचे आमदार आहेत. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते, हे मला मान्य आहे. आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करू. असे केसरकर यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, संतोष बांगर हे आक्रमक आमदार आहेत. ते जे काही करतात, त्यांच्यामागे एक कारण असते. मागे एकदा शालेय पोषण आहारात अळ्या साडपल्या होत्या. तेव्हा त्यांनी अशा प्रकारं वर्तन केलं होतं. आताही अशाच प्रकारे काही तरी कारण असेल. मात्र, कारण कोणतंही असो, अशा प्रकारे कोणाला मारहारण होता कामा नये. यासाठी कायदा आहे. असेही केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितले.