राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राऊतांना रस्त्यावर जोड्याने मारतील; शिरसाटांचा घणाघात, राष्ट्रवादी फोडण्यात...

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राऊतांना रस्त्यावर जोड्याने मारतील; शिरसाटांचा घणाघात, राष्ट्रवादी फोडण्यात...

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलायं.
Published on

मुंबई : संजय राऊतांनी चाटूगिरी करू नये. ते काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत, अशा शब्दात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत कोणाला एकत्र टिकू देणार नाही. राष्ट्रवादी फोडण्यात सुद्धा मोठा सहभाग त्यांचा आहे, असा मोठा आरोप शिरसाटांनी केला आहे. एक वेळ अशी येईल राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते हे संजय राऊत यांना रस्त्यावर जोड्याने मारतील हे निश्चित आहे, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राऊतांना रस्त्यावर जोड्याने मारतील; शिरसाटांचा घणाघात, राष्ट्रवादी फोडण्यात...
...म्हणून मी राजीनाम्याचा निर्णय माझ्या मनाने घेतला; शरद पवारांनी अखेर सांगितले कारण

राष्ट्रवादी घडामोडीनंतर वज्रमुठ सभा यापुढे होणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं. त्याचे संकेत नाना पटोले यांनी सुद्धा दिले आहेत. वज्रमुठ सभा आता यापुढे होणार नाहीत. महाविकास आघाडीचा आता मुळात अस्तित्वात राहणार नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत हे सगळ्या पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे नाना पटोले यांनी त्यांना चांगलं उत्तर दिलं. नाना पटोले त्यांना चोमडे म्हटले थोडी तरी लाज बाळगा. हे आता म्हणताय तुम्ही चाटुगिरी कशी करता? या वज्रमुठीचे हे संवाद आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

संजय राऊत कोणाला एकत्र टिकू देणार नाही. शिवसेना फोडण्यामध्ये सगळ्यात मोठा हात संजय राऊत यांचा आहे. राष्ट्रवादी फोडण्यात सुद्धा मोठा सहभाग त्यांचा आहे. अजित पवार आणि कुटूंबात कलह माजविण्याचा काम संजय राऊत यांनी केले आहे. एक वेळ अशी येईल राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते हे संजय राऊत यांना रस्त्यावर जोड्याने मारतील हे निश्चित आहे, असा निशाणा शिरसाटांनी राऊतांवर साधला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आज त्रास होतोय तो संजय राऊत यांच्यामुळेच. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा नेमकी कोणाकडे जाते हे एकदा पाहू द्या त्यांचा निर्णय झाल्यानंतर कळेल. त्यांचा निर्णय झाल्यानंतर पुढचं राजकीय भवितव्य कळेल. शिवसेना आणि भाजप यांची विचारसरणी त्यांनी स्वीकारली तर निश्चितच राष्ट्रवादीचे स्वागत असेल, असे म्हणत राष्ट्रवादीतील नेते भाजपा-शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत संजय शिरसाटांनी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com