Deepak Kesarkar | Uddhav Thackeray
Deepak Kesarkar | Uddhav Thackeray Team Lokshahi

फ्रिजचे मोठे खोके भरून पैसे कोणाकडे गेले, केसरकारांचा ठाकरेंना इशारा

आमची बदनामी करण्यासाठी तुमचे माणसं महाराष्ट्रभर फिरतात. पण बदनामी करण्याची पण एक मर्यादा असते हे लक्षात घ्या.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. याच गदारोळा दरम्यान आता शिंदे गट पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचा बुलढाण्यात शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्वच विषयावर भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र डागले होते. त्यावरच आता शिंदे गटातील आमदार मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Deepak Kesarkar | Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, काहींना जनाची...

काय म्हणाले दीपक केसरकर?

उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देतांना केसरकर म्हणाले की, ''खोके-खोके म्हणून कोणाला हिणवता. एक दिवस या आमदारांचा संयम सुटेल त्यावेळी तुम्हाला समजेल. फ्रिजचे मोठे खोके भरून पैसे कोणाकडे गेले हे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही'' असे ते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, ''तुम्ही कोणाला गद्दार म्हणता तुम्हाला भेटायला २५ आमदार आले होते. ते तुम्हाला सांगत होते हिंदुत्वापासून दूर जायला नको, आपण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर जाऊ, पण तुम्ही ऐकलं नाही. आता तर तुम्ही खोटं बोलण्याची मोहीम चालवलीय. मात्र तुम्ही कोणाची बदनामी करता? ज्या लोकांनी तुमच्यासाठी पूर्ण जीवन ओतलं त्यांची बदनामी करता. पण ज्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीसाठी हिंदुत्व सोडलं ना त्यांना विचारा आयोध्याची रथयात्रा कोणी आडवली होती. आता हिंदुत्व कोणाला शिकवता'', असे केसरकर संतापून म्हणाले.

'आमची बदनामी करण्यासाठी तुमचे माणसं महाराष्ट्रभर फिरतात. पण बदनामी करण्याची पण एक मर्यादा असते हे लक्षात घ्या.आम्ही जर तुमच्याबद्दल बोलायला लागलो तर तुमचीही बदनामी होईल. आता पाणी नाकाच्या वर गेलंय. पाणी नाकाच्यावर गेलं तर माकड सुद्धा आपल्या लेकराला खाली घालून आपला जीव वाचवतं. मात्र तुमचा आदर आहे म्हणून आम्ही बोलत नाहीत'', असं म्हणत केसरकरांनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना इशाराही दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com