ठाकरे गट- वंचित युतीवर शिंदे गटाची टीका; म्हणाले, जे कधी महापरिनिर्वाण दिनाला...
राज्यात राजकीय गोंधळा दरम्यान ठाकरे गट-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा रंगली आहे. त्यातच शिवसेना (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात आज पहिली बैठक झाली. त्यानंतर युतीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, शिंदे गटाने या युतीवर आता टीका केली आहे. जे कधी महापरिनिर्वाण दिनाला बॅनर लावत नव्हते. त्यांना मदतीची गरज आहे. हिंदुत्व सोडलं म्हणून वंचितही गरज आहे, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली.
काय म्हणाले केसरकर?
जे कधी महापरिनिर्वाण दिनाला बॅनर लावत नव्हते. त्यांना मदतीची गरज आहे. हिंदुत्व सोडलं म्हणून वंचितही गरज आहे. आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली. आता वंचितशी सलगी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर जायचं की, नाही याचा निर्णय वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना घ्यायचा आहे. तो निर्णय़ ते योग्य पद्धतीनं घेतली, असं मला वाटते. कारण त्यांना बाबासाहेब यांचा वारस आहे. बाबासाहेबांचा वारस चालवत असताना मतं कुठं मिळतील, यापेक्षा बाबासाहेबांचा वारसा जपनं हे अधिक महत्त्वाचं असतं. आम्ही वारसा जपण्याच्या दृष्टिकोनातून बघतो.
उद्या महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांचा ऐतिहासिक ठेवा जतन केला गेला पाहिजे. पंचायतची इमारत असो की, आंतरराष्ट्रीय सोशल जस्टीस मुव्हमेंट कशी पुढं नेता येईल, याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.विचाराचा ठेवा महाराष्ट्राच्या पलीकडचा आहे. तो ठेवा जपला गेला पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटते, तो ठेवा जपला गेला पाहिजे. त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत, असं दीपक केसरकर म्हणाले.