शिंदे सरकारचा खडसेंना धक्का! दूध संघाच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती गठीत

शिंदे सरकारचा खडसेंना धक्का! दूध संघाच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती गठीत

Eknath Khadse यांच्या पत्नी अध्यक्षा असलेल्या दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून केले प्रशासक नियुक्त
Published on

जळगाव : शिंदे सरकारने (Shinde Government) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) मोठा धक्का दिला आहे. खडसेंची पत्नी अध्यक्षा असलेल्या जिल्हा दूध सहकारी कारभारातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी चौकशी समिती गठीत केली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त केले आहे. त्यामुळे एकदा खडसे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिंदे सरकारचा खडसेंना धक्का! दूध संघाच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती गठीत
शिंदेंचा मोर्चा ज्येष्ठ नेत्यांकडे; मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या भेटीला

जिल्हा दूध संघाचे माजी मंत्री माजी सुरक्षा अधिकारी नागराज पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता तसेच या दूध संघात राबविण्यात आलेली कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व झाल्याची तक्रार शासनाकडे केली होती. मात्र, मागील काळातील महाविकास आघाडी सरकारकडून त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नव्हती.

परंतु, आता शिंदे सरकारने यावर अ‍ॅक्शन घेत जिल्हा दूध सहकारी कारभारातील अनियमिता व गेल्या काळातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनाच्या वतीने चौकशी पाच जणांची समिती गठीत केली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खडसेंच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिंदे सरकारचा खडसेंना धक्का! दूध संघाच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती गठीत
Jayant Patil : शिंदे सरकारने सत्ता आल्यानंतर लक्ष दिलं असतं तर...

दरम्यान, या प्रकरणाी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ही मोठी राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे. यात दूध संघाच्या कारभारात एक रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही. जर झाला असेल तर दोषींवर कारवाई करावी, असेही खडसे यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com