संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्टी सोहळ्याच्या पुजेसाठी शिंदे-फडणवीसांना बोलवणार : भुमरे

संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्टी सोहळ्याच्या पुजेसाठी शिंदे-फडणवीसांना बोलवणार : भुमरे

पैठण येथे साजऱ्या होणाऱ्या नाथषष्टी यात्रा उत्सवाबाबत विविध विभागाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला.
Published on

सुरेश वायभट | पैठण : नाथषष्टी यात्रा उत्सवनिमित्त पैठण येथे राज्यभरातून भाविक येतात. यंदा 15 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व विभागांनी भाविकांना तत्पर सेवा देण्यासाठी समन्वयाने काम करावे आणि यात्रा उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले. पंढरपुर प्रमाणे संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्टी सोहळ्याच्या शासकीय पुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्टी सोहळ्याच्या पुजेसाठी शिंदे-फडणवीसांना बोलवणार : भुमरे
संजय राऊतांवर उध्दव ठाकरे गप्प का? बावनकुळेंचा सवाल

पैठण येथे साजऱ्या होणाऱ्या नाथषष्टी यात्रा उत्सवाबाबत विविध विभागाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला. या बैठकीत एसटी वाहतुक सुविधा, आरोग्य विभाग पुर्व तयारी, नाथषष्टी काळात जायकवाडी धरणातुन गोदापात्रात सोडण्यात येणारे पाणी, गोदावरी वाळवंटातील साफसफाई, बीएसएनएल दुरसंचार सेवा, नगर पालिका पाणी पुरवठा व्यवस्था, नाथ मंदिर ट्रस्ट कडुन भाविकांसाठी सोयी सुविधा, पोलिस बंदोबस्त, जीवन प्राधिकरण यांच्या कडुन करण्यात येणारी कामे, पैठण शहरात विद्युतीकरण सजावट व्यवस्था आदी भौतिक सोयी सुविधा देण्याबाबत आढावा घेण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com