शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला! संजय शिरसाट, बच्चू कडूंचा समावेश?

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला! संजय शिरसाट, बच्चू कडूंचा समावेश?

राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार विराजमान झाले होते. या सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता.
Published on

मुंबई : राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार विराजमान झाले होते. या सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली होती. यानुसार मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त आता ठरविण्यात आला असून आठ जणांची नावे शर्यतीत आहेत. यामध्ये संजय शिरसाट, बच्चू कडू यांचाही समावेश आहे.

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला! संजय शिरसाट, बच्चू कडूंचा समावेश?
'महाराष्ट्रात भाजपच पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही'

सुत्रांनुसार, शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पुढच्या विस्ताराची तारीख ठरली असून पुढच्याच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. हा २३ किंवा २४ मे रोजी घेण्याची चर्चा आमदारांमध्ये सुरू आहे. यामध्ये आठ नेत्यांची नावे विशेषताः चर्चेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांचे प्रतोद पद बेकायदेशीर ठरवल्यानंतर त्यांना जलसंधारण खाते देण्यात येईल. तर, मंत्री पदावरुन नाराज म्हणून चर्चेत असलेले संजय शिरसाट यांना परिवहन अथवा सामाजिक न्यायमंत्री खाते देण्याची शक्यता आहे. तर, बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रीपद देण्यात येण्याची माहिती आहे.

शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नसल्याने सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. अखेर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात यामिनी जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, दादरमधील गोळीबारप्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर अडचणीत आले होते. पोलीस स्थानकाबाहेर गोळी चालविण्याचा आरोप त्यांच्यावर होता. परंतु, मार्चमध्ये सरवणकरांना पोलिसांनी क्लीनचिट दिलीे होती. यानंतर आता सदा सरवणकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. यांसह अनिल बाबर, चिमन आबा पाटील यांचीही नावे मंत्रिमंडळात समावेशासाठी चर्चेत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये एकाही भाजप नेत्याचे नाव नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com