यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम; मराठा संघटना आक्रमक

यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम; मराठा संघटना आक्रमक

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ येथे येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ येथे येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे यवतमाळच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही आहेत. अजित पवार यांना डेंगू झाल्याने गैरहजर राहणार आहेत तर देवेंद्र फडणवीस छत्तीसगडच्या रायपूर दौऱ्यावर जाणार आहेत.

शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज यवतमाळ जिल्ह्यात पार पडत आहे. त्यातच मराठा आरक्षणाचे आंदोलन तापले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांना अनेक ठिकाणाहून पाठिंबा मिळताना दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान मराठा संघटनाकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com