sharad pawar
sharad pawarTeam Lokshahi

पवार म्हणतात, शिंदे सरकार दोन कारणांमुळे सहा महिन्यांत कोसळेल

शिंदे सरकार फक्त सहा महिन्यांत कोसळेल, मध्यवधी निवडणुकीसाठी तयार राहा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकाराचा शपथविधी होऊन चार दिवस झाले नसतांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठे भाकीत केले आहे. शिंदे सरकार फक्त सहा महिन्यांत कोसळेल, मध्यवधी निवडणुकीसाठी तयार राहा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे सरकार आज शक्तीपरीक्षणाला सामोरे जाणार आहे. रविवारी विधान सभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकरांचा दणदणीत विजय झाल्यामुळे आजच्या शक्तीपरीक्षणात शिंदे सरकार सहज पास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु देशातील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख असलेल्या शरद पवारांनी शिंदे सरकारचे भवितव्य वर्तवले आहे. हे सरकार केवळ सहा महिन्यात कोसळणार आहे. त्यासाठी दोन कारणे पवारांनी दिली आहे.

sharad pawar
राहुल गांधींचा चुकीचा व्हिडिओ व्हायरल, न्यूज अँकर आणि भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल

१) शिंदे गटाच्या नाराजीबद्दल पवारांनी भाष्य केलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व सुरळीत नाही. त्यांची अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही जणांना मंत्रिपद मिळेल; पण अनेकांना मंत्रिपदाची मिळणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांच्यांत नाराजी वाढेल. त्यातून शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते,”

२) भाजपाच्या गटामध्येही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न मिळल्याने नाराजी आहे. फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्ते नाराज आहे. “भाजपचा मुख्यमंत्री न झाल्याने भाजपच्या आमदारांनाही शिंदे-फडणवीस सरकार हे आपले वाटत नाही. त्याचा परिणाम सरकारच्या स्थैर्यावर होणार आहे,”

sharad pawar
उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; एकनाथ शिंदेंना विधीमंडळ गटनेतेपदी मान्यता

शिंदे सरकारमधील सर्व राजकीय परिस्थिती पाहता हे सरकार कोसळल्यानंतर विधानसभेची निवडणूक होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे पवारांनी सांगितले.

आज शिंदे सरकारचे शक्तीपरीक्षण

शिवसेना आणि भाजप सरकारकडे बहुमत असले तरी जेव्हा प्रत्यक्ष मतदान सुरू होईल तेव्हा काय होईल हे सांगता येत नाही. यासाठी पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेना आमदारांनी व्हीप न पाळल्यामुळे विधानसभा अध्यक्षांना 39 आमदारांच्या निलंबनासाठीही मागणी केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com