धनुष्यबाणाचा वाद : शरद पवारांनी स्पष्टच सांगितले...
मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. आता या निर्णयामुळे ठाकरे गटात आणि शिंदे गटात वाद आता आणखीच तीव्र झाला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता धनुष्यबाणाच्या वादात पडणार नाही, असे स्पष्ट सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत बोलताना पवार म्हणाले, सहकार परिषदेच्या समारंभासाठी पुण्यात आले होते. सहकार परिषदेचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडलं. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाही. धोरणात्मक विषयांवर आणि सविस्तर चर्चा केली. त्यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे आज योग्य वाटले. बाकी राज्यात सुरू असलेल्या धनुष्यबाणाच्या वादात मी पडणार नाही एकदाच सांगितलंय, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.
दरम्यान, तो निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्यावर चर्चा काही करता येणार नाही. त्यांना फारसा फरक पडणार नाही. ते स्वीकारुन नविन चिन्ह घ्यावं लागेल. मागेही कॉंग्रेसचं गाय वासरु चिन्ह होतं. पंजा घेतला. पण, त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते स्वीकारलं. आताही फरक पडणार नाही. काही दिवस चर्चा होत राहील. नंतर लोक विसरुन जातील, असे याआधीच शरद पवार यांनी म्हंटले होते.