अजित पवार राजभवनात दाखल; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशातच, राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि नेत्यांची आज अजित पवार यांच्या घरी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही मंत्र्यांसह राजभवनात दाखल झाले आहे. यामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षही फुटणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, मला आजच्या बैठकीचे नियोजन काय आहे माहिती नाहीत. पण विरोधी पक्ष नेता म्हणून विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक त्यांना बोलवण्याचा आधिकार आहे. त्यांनी बैठक बोलवली आहे. काय चर्चा होईल हे रात्री माहिती घेऊन सांगतो.
प्रदेशाध्यक्ष पद विषयी आणि त्या संदर्भात संबधित मी ६ तारखेला बैठक बोलावली आहे. यात संघटनात्मक बांधणी करण्यावर चर्चा करणार आहोत. संघटनेत बदल करण्याची गरज आहे का? यावर विचार होणार आहे. अजित पवारांनी काही सूचना दिल्या आहेत त्या देखील विचारात घेतल्या जातील, असे त्यांनी म्हंटले आहे.
दिल्लीला मी पण गेलो ते पण गेले आणि जयंत पाटील पण गेले होते. पण अशोक पवार यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. ते सगळ्यांच्या समोर बोलले की त्यांना संघटनेत काम करण्याची इच्छा आहे. बैठकीत निर्णय होईल मी एकटा घेतं नाही. पक्ष फुटू शकतो का तर असं तुम्हाला वाटतं आम्हाला नाही. चर्चा कोण घडवत आहे माहिती नाही. पण आम्ही चर्चा करत नाहीत, असे म्हणत शरद पवारांनी पक्षफुटीच्या चर्चा फेटाळल्या आहेत.