राहुल गांधींची खासदारकी रद्द! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; लोकशाहीच्या मूल्यांना छेद

राहुल गांधींची खासदारकी रद्द! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; लोकशाहीच्या मूल्यांना छेद

राहुल गांधी यांची आता खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याचा विरोधकांनी जोरदार निषेध केला
Published on

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानहानी प्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. अशातच, राहुल गांधी यांची आता खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याचा विरोधकांनी जोरदार निषेध केला असून टीकास्त्र सोडले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधींची खासदारकी रद्द! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; लोकशाहीच्या मूल्यांना छेद
देशाच्या परंपरेला तिलांजली देण्याचे काम : अजित पवार

आपली राज्यघटना प्रत्येक व्यक्तीच्या न्याय्य अधिकाराची हमी देते. विचार स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची समानता आणि प्रत्येक भारतीयाच्या सन्मानाची खात्री देते. राहुल गांधी आणि फैजल यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरवणे हे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. जिथे लोकशाही मूल्यांना छेद दिला जात आहे. हे निषेधार्ह आणि संविधान ज्या तत्त्वांवर आधारित आहे त्या तत्त्वांच्या विरोधात आहे. आपल्या लोकशाही संस्थांचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र उभे राहण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. याप्रकरणी अखेर सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामध्ये न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीनही मंजूर केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com